नमुना हाताचे परिक्षणहस्तसाुद्रिक शास्त्राचं  व्यवसाय करीत असताना मी आजपर्यंत हजारो  हात बघितले. त्यातील काही हातांमध्ये मला वेगळेपणा जाणवला. असे वेगळेपणा असलेल्या हाताचे नमुना परिक्षण पुढीलप्राणे

नमुना हाताचे परिक्षण
 
 • अनेक व्यक्तींच्या आयुष्यात विस्मयकारक स्थित्यंतरे होतात. शाळेत ढ विद्यार्थी आपल्या आवडीच्या क्षेत्रात गेल्यास नेत्रदीपक यश मिळवता  तर वर्गात सतत पहिला येणारा विद्यार्थी पुढे खर्डेघाशी व नियमित मिळणाऱ्या  वेतनवाढीध्ये साधान मानत जातो भाजीवाला मंत्री होतो.   तमासगीर आमदार होतो. एक हमाल मोठा स्मगलर होतो . ज्याला आख्खी मुंबा घाबरते. अध्यातमचा नाटकी उपयोग करून लाखों ना नादी लावणारी माणसं त्यांची मालमत्ता   उभी राहते हेही आपण बघतो  तरुणपणी सौंदर्याने घायाळ करणारया मादक अभिनेत्री  दहा वर्षानंतर कुणाच्या लक्षातही राहत नाहीत. उलट बस किंवा रेल्वेच्या डब्यातून प्रवास करतांना आढळतात. त्यावेळी त्यांना ओळखणेही कठिण असते. जिचे नावही चर्चेत नाही व कधी मुख्यंत्रीपद किंवा कबिनेट मंत्रिपदही सांभा ळलेले नाही अशी स्त्री भारताची  राष्ट्रपती होते. जर सर्वच गोष्टी मानवाच्या अधीन असत्या तर अशी आश्चर्ये केव्हाच घडली नसतील. असे घडण्याामागे   कर्माचे स्वातंत्र्य व मर्यादा याचा विचार अपरिहार्यठरतो  कर्म केले तरी अपयश आले. कर्म न करताही यश आले असे वाटू लागते की फक्त नशिबच खरे कर्म नाही; पण चक्र उलटे फिरू शकते.

  सौंदर्या नामक (नाव बदलले आहे) अभिनेत्री  जिने एक दोन  चित्रपटात रसिकांना जिंकल्यावर तिचा अचानक मृत्यू झाला. तिचा हात येथे देत आहे

 • A]  सदरील हात किंचित निमुळत्या प्रकारचा आहे. हा हात कलाप्रिय स्वभाव  दिसण्यास सुंदर आणि कलेच्या बाबतीत अष्टपैलूवृत्ती दर्शवितो  आयुष्य रेषा व मस्तकरेषा यामध्ये सुरुवातीला अंतर, यातून फाजील आत्मविश्वास, मुर्खपणा, उतावीळपणा, परलिंगी व्यक्तीबद्दल विशेष आकर्षण याचा बोध होतोा 
  भाग्यरेषेचा उगम आयुष्यरेषेतून याचा अर्थ अशी व्यक्ती स्वतःचे विष्य स्वतःच बनविते. लहानपणी ती चांगली गात असे; परंतु आवाजाचा दर्जा घसरल्याने ती अभिनय  आणि नृत्याकडे वळाली. हातावरील आयुष्यरेषेवर आतल्या बाजूस यव चिन्ह त्यामुळे नेहमी तब्येतीच्या तक्रारी.

 • B] वय वर्ष 19,20, 21, 22 प्रगतीकारक दर्शवितात. कलेची प्रगती होईल. (या वर्षात तिने रंगंचावर अभिनय  व नृत्य सादर केले.)

 • C] वय 23 वर्ष स्थलांतराचा योग्य दर्शवितो . (वय 23 असतानाच ती मुंबईला  आली.) याच काळापासून सरळ मस्तक रेषेने तिच्या कलासक्त स्वभावावर   नियंत्रण ठेवले व व्यवहारी बनविले.
 • D] वय वर्ष 24 असताना विवाहयोग, विवाह रेषेत दोष, वैवाहिक सौख्य  नाही वय 25 वर्षे घटस्फोट.

 • E] वय वर्ष 25 अचानक भाग्योदय  होईल . (याच काळात भाग्यरेषेतून एक रेषा रवीवर जाते.) समाजात नाव लौकीक, पैसा, वैव असे योग्य .

 • F] वय वर्षे 26, 27 उत्तम भाग्याचा काळ, चांगल्या घडामोडी घडतील. वय वर्षे 28, 29 उतरती कळा लागेल. स्वतःच्या चुकीने घेतलेल्या निर्णयामुळे सर्व काही नष्ट होण्याचा होग. (याच काळात तिने दुसरा विवाह केला. याच काळात  भाग्यरेषेला प्रभाव  रेषा जोडलेली आहे.).तिचा हा विवाह यशस्वी ठरला नाही. कारण अंतःरेषेतून खालच्या बाजूला बऱ्याच  अर्धगोलाकार रेषा आलेल्या दिसतात. वासना रेषा त्यामुळे वाइट व्यसनांची सवय लागेल. वय वर्ष 30, 31, 32 अतिशय सामान्य जीवन. वेडाचे झटक¢के  येणे. (मस्तक रेषेत यव चिन्ह) रस्त्यावर इकडे तिकडे टकणे अशा प्रकारचे योग्य याच स्री ला  आपल्या शेवटच्या काळात देह विक्रीही करावी लागली. (सदरील सौंदर्यवती सरकारी रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागातून औषधोपचार घेत मरते. त्यावेळी बेवारशी म्हणून तिचे प्रेत लोटगाडीवरून नेले जाते. हे वर्तानपत्रातील दोन ओळींवरून समजते.)
 •  
 •  
 •  
 •  
 येणाऱ्या  घटनांची चाहूल देणारे शास्त्र
 • ‘योजितो  नर एक दैव योजी दुसरे’ असे प्रत्येकाला व्यवसायाबाबत खटपट करताना अनुभवयास येते. खूप शिकलेला मनुष्य मामूली कारकूनी करतो , तर ‘ढ’ माणसांच्या बँका चालतात. सायन्स विषयाचा पदवीधर अंगठे बहादराच्या हाताखाली रायटर होतो¨. रेकॉर्डकिपर होतो . स्पर्धा परीक्षा पास होणारी व उच्चांक मिळविणारी हुशार व्यक्ती मागेच राहते, वशिलेवाला माणूस त्याचा वरिष्ठ म्हणून येतो . वशिल्याची परीक्षा मोठी  ठरते. वशिला म्हणजे बढतीची प्रॉमोसरी नोट, साहित्यात मोठमोठी बक्षिसे मिळवणारा मिलिटरी अकौंटमध्ये अप्पर डिव्हीजन क्लार्क होतो काय हे बरोबर  आहे का? हा अन्याय म्हणावा का? मग शिकायचे तरी कशाला? पालकांना वाटते मुलगा इंजिनिअर व्हावा  मुलगा म्हणत¨ मी डॉक्टर होणार . परीक्षेत गचके  खाताना एक दिवस मेडिकल कॉलेजात प्रवेश मिळण्याइतके भाग्य उजळते. तिथे एक वर्ष झाले आणि थोडी माघारी वळून बी.एस्सी.च्या वर्गात आले. मग वेगवेगळे क¨र्सेस केले. तिथे शंखनाद झाला. मग सोपी  अशी घरबसल्या अभ्यास करून होमीओिपॅथीची पदवी घेतली संपले! मग दवाखानाही नाही चालला. शेतीही नाही, फक्त बापजाद्यांनी ठेवलेले भाडे हेच उत्पन्न घेण्यापुरते का राहिले. मनाचा अहंकार काहीच करू देईना. बायकांचे व मुलांचे या चत्कारीक माणसाशी पटेना. मग जादूतोणा, करणी वगैरे! संसाराचे दोन तुकडे हे प्रत्यक्ष घडलेले दुसरे उदाहरण पहा शेंडेपळ म्हणून हट्टी व लाडावलेला मुलगा भातपिठले खाताना लाखांच्या गप्पा मारीत असे. शिकण्याच्या नावाने 9 वी नापास होताच कायमच्या सुटीची घंटा वाजवली. त्याच्या वडिलांनी माझ्या मार्गदर्शनानुसार 10 वीच्या परीक्षेला बसवून नॉन मॅट्रीकचा शिक्का मारून घेतला हो! त्या शिक्क्यास महत्त्व आहे. नंतर त्याला  मोटर मेकॅनिकच्या कोर्समध्ये  घातले. कोर्स झाल्यानंतर दोन-तीन वर्षे नऊ करी करून स्वतःचे मोठे गॅरेज आहे. आज रोजीचे उत्पन्न महिन्याकाठी दोन ते तीन लाख रुपये आहे की नाही लायकीपेक्षा जास्त! फक्त लाईन (व्यवसाय) बरोबर धरली हाच शहानपणा. असा शहाणपणा प्रत्येक पालकाने दाखल्यानंतर पैसे, श्रम व वेळ यांची बचत होईल. पण, योग्य सल्ला देईल? याचे उत्तर  हस्तसामुद्रिक शास्त्राचा व्यवसाय मार्गदर्शनासाठी, शिक्षणासाठी चांगला उपयोग होऊ शकतो , हे अनेक उदाहरणांवरून लक्षात येते. त्याचप्रमाणे आयुष्यात पुढे येणाऱ्या संकटाची सूचना हाताच्या अभ्यासावरून कालनिर्णयावरून मिळते. याचा उपयोग  करणे हे मात्र त्या त्या व्यक्तीवर अवलंबून आहे.
 •  
 • नमूना हाताचे परिक्षण (सोबतच्या ठशाचे)

 • 1)  हातावरील सर्व ग्रहाचे उंचवटे चांगल्यापैकी विकसीत - कार्यसिद्धी व इच्छापूर्ती , रवीब¨ट व करंगळीत अंतर-कृतीशीलता दाखवते याचाच अर्थ नातील विचार प्रत्यक्षात उतरवण्याची कार्यक्षमता, हातावर दोन  भाग्यरेषा - अति महत्वकांक्षी स्वभाव, हातावर मोठी रवी रेषा-पैसा, यश व किती, गुरू उंचवट्याााावर फुली- अडचणीवर मात सुखी वैवाहिक जीवन श्रींमत विवाह. 

  2) वय वर्षे 20, 21 भाग्यरेषेची सुरुवात स्वतःच्या पायावर उभे, वय वर्षे 22, 23, 24 प्रगतीचा काळ वय वर्षे 24।।, 25 धंद्यात प्रवेश ह¨ईल. स्वतःचा व्यवसाय राहील.

  3) वय वर्षे 26, 27 व 29 भरभराटीचा काळ राहील, वय वर्षे 26।।, 27 विवाहयोग , विवाहानंतर अधिक काळ प्रगती होईल.

  4) वय वर्षे 29।।, 30 जीवनास यशस्वी कलाटणी मिळेल भाग्योदय होईल  . 

 • 5) वय वर्षे 31, 32 ते 27 वेगाने प्रगती होईल. स्थावराचे योग्य  येतील आर्थिक सुबकता  येईल.

 • 6) वय वर्षे 37।।, 38 दुहेरी व्यवसायात पदार्पण होईल  वय वर्षे 38।।, 39 बौद्धीक चुकीच्या अंदाजाने एक व्यवसायात नुकसान होईल. धनहानी संभवते वय वर्षे 40, 41 ते 43 संमिश्र कालखंड राहील. 7) वय वर्षे 44, 45 भाग्य¨दयाचा श्रीगणेशा होईल. वय वर्षे 46, 47 ते 54 जीवनाचा सुुवर्णकाळ राहील. धनलाभाचे मोठेलाभ होतील. वय वर्षे 57, 58 ते पुढील जीवन सुखी समाधानी राहील.

  (सदरील मुलगा 2001 साली माझेकडे आला होता . 9वी नापास झाला होता. त्याच्या वडिलांनी मी सांगितल्याप्रमाणे निर्णय घेतले. आज ह्या मुलाचे पिंपरी चिंचवड येथे चारचाकी गाड्याांचे गॅरेज आहे.) वरील भविष्यकथन हे स्वतःची प्रौढी   मिरविण्यासाठी नसून तर  हस्तसामुद्रिक शास्त्राचा  गौरव आहे असे वाचकांनी समजावे अशी विनंती आह

 यशस्वी राजकारण्याचा हात
 • 1) हातावर दोन भाग्यरेषा आहेत. एका भाग्यरेषेचा उगम आयुष्य रेषेतून तर दुसऱ्या  भाग्यरेषेचा उगम चंद्र उंचवट्याावरून झालेला आहे. आयुष्य रेषेतून उगम पावणाऱ्या  भाग्यरेषेचा अर्थ अशी रेषा स्वकष्टार्जित यश दाखविते.परंतु या यशाला घरची परिस्थिती सुद्धा कारणीभूत असते. अशा व्यक्ती सतत कष्ट व प्रयत्न करणाऱ्या असतात. चंद्र उंचवट्याावरून सुरू होणाऱ्या भाग्यरेषेचा अर्थ अशा व्यक्तिस विरुद्ध लिंगी व्यक्तीपासून मदत मिळून तिचे जीवन सुखी होते. थोडक्यात अशा व्यक्तीचे यश इतरांच्या मदतीवर अवलंबून असते. 

  2) हातावर मोठी व सरळ रवी रेषा असल्याने या व्यक्तीची अभिरुची उच्च प्रकारची आहे. या व्यक्तीध्ये विविध क्षेत्रात उच्च पातळीवरील कामे करण्याची धमक आहे. या रेषेमुळे या व्यक्तीला जीवनात पैसा आणि कीर्ती सहजगत्या मिळते.

  3) उठावदार गुरू उंचवटा असल्याने धार्मिक वृत्ती तसेच अधिकार पदमिळते . गुरू उंचवट्याावर फुली चिन्ह आणि अंगठ्यााच्या पहिल्या पेऱ्यातील यव चिन्ह सुखी, कौटुंबिक जीवन दर्शविते. 

  4) मस्तक रेषेतून निघालेला एक फाटा हृदय रेषेकडे कुणाएका व्यक्तीबद्दल आत्मियता दर्शविते.

 • 5) आयुष्यरेषेतून निघणाऱ्या प्रवास रेषेच्या शेवटी फुलीचे चिन्ह याचा अर्थ प्रवासात अपघात होऊन, पाण्यात बुडून अथवा जलोदर रोग  होऊन मृत्यू.

 • 6) वय वर्ष 23 भाग्यरेषेची सुरुवात. स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा योग्य . कर्तृत्वास प्रारंभ .

 • 7) वय वर्ष 25 जीवनात बदल दर्शवित¨. याचाच अर्थ विवाह योग्य . विवाहानंतर भाग्योदय  दर्शवितो .

 • 8) वय वर्ष 26 भाग्योदय होईल याच  वर्षी ही व्यक्ती पीडब्ल्यूडी खात्यात अभियंता  म्हणून कार्यरत झाली.

 • 9) वय वर्ष 27, 28, 29, 30, 31 आर्थिक प्रगतीचा काळ, स्वतःच्या घराचे योग्य , तसेच स्थावर मालमत्ताचे योग्य  वय वर्ष 31 नौकरीचा  राजीनामा.

 • 10) वय वर्ष 31।।, 32 धंद्यात प्रवेश, धाडसी व्यवसायातून प्रगती.

 • 11) वय वर्ष 35।। राजकारणात प्रवेश, पहिल्याच प्रयत्नात ही व्यक्ती जिल्हा परिषद सदस्य झाली. वय वर्ष 39 जिल्हा परिषद अध्यक्ष.

 • 12)  वय वर्ष 39, 40, 41, 42, 43 असामान्य यश. वय वर्ष 44, 45, 46 अफाट लोंग कप्रियता. (याच काळात आमदार) वय वर्षे 47, 48, 49, 50 सुवर्णकाळ राहील.

 • 13) वय वर्षे 51 अचानक मोठे पद मिळेल. यश वैैव, समाजात मान-मरातब राहील. वय वर्ष 52, 53, 54, 55 ते पुढील जीवन सुखी तसेच यशस्वी जीवन राहील. (ही व्यक्ती आज महाराष्ट्र सरकारध्ये कबिनेट मंत्री म्हणून विराजमान आहे. तसेच याहूनही मोठे पद मिळवणारा  असा माझा होरा  आहे. )
‘‘विद्येविना मती गेली’’
 • ‘विद्येविना मती गेली’असे बजावून सांगत हात ज्योतिबा फुले यांनी अविद्येमुळे होणारे अनर्थ लोकांसमोर मांडले. स्वतः शिक्षणाचा प्रचार केला. पत्नी सावित्रीबाईंना शिकवून भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यासाठी अनेकांचे शिव्या-शापही झेलले. कालौघात आज उच्च शिक्षणासाठी सर्वांची धडपड सुरू आहे. अशिक्षित पालक सुद्धा मुलांना शिकवून मोठे  करायची स्वप्ने पाहात असतात, परंतु उच्च शिक्षणाचा योग  किती जणांना येत¨? प्रतिकूल परिस्थिती असूनही काहीजण अत्युच्च शिक्षण घेतात. याउलट सर्वत¨परी अनुकुलता असूनही काहींची शिक्षणात प्रगती अजिबात होत नाही असे का? शिक्षण आणि पैसा, प्रसिद्धी यांची समीकरणे गंमतीशीर असतात. एखादा मेकॅनिक गडगंज होतो  तर उच्च शिक्षित असूनही एखाद्या वकीलावर फाके  मारण्याची वेळ येतेे. एक उदा. विलास मोघे (नाव बदललेले आहे) सामान्य घरातला हुशार विद्यार्थी म्हणून प्राथमिक शाळेपासून ओळखला जाई. विविध शैक्षणिक स्पर्धात यश मिळवून शाळेचे नाव गाजवत होता. हुशार असूनही ऐन शैक्षणिक वर्षात त्याने आत्मविश्वास गमावला. ऐनवेळी रथाचे चाक भूमीत गेलेल्या कर्णाप्राणे परीक्षेत त्याला विस्मरणाचा झटका येऊ लागला. हातावरील मस्तकरेषेतील दोषामुळे बौद्धीक विकास ठप्प झाला. मात्र तो प्रतिकूल काळ सरल्यावर शिक्षण सोडून व्यवसायात तो पाहता पाहता यशस्वी झाला. आज त्याच्या नावापुढे पदव्यांची रांग नसली तरी बंगल्यासमोर  गाड्याांची रांग आहे. याऊलट चंद्रकांत (नाव बदललेले आहे.) उद्योगपतींचा  मुलगा. आई सुशिक्षित, बुद्धीमान, उत्तमशाळा, क्लासेस, खासगी मार्गदर्शनासाठी नामांकीत शिक्षकांची नेमणूक, चहूबाजूंनी अनुकुलता, दहावीपर्यंत शाळेत पहिला. पुढील शिक्षणात मुळीच कसूर नको  असे ठरवून आईवडिलांनी विशेषतः आईने कंबर कसली. त्याच्या उपासनेकडे व आहाराकडे आई जास्त लक्ष देवू लागली. आईच्या परिस्थितीचा नको  तसा फायदा चंद्रकांतने घेतला. पॉकेटमनी वाढवून घेतला. पैशाचा प्रश्न नव्हता. कौतुकाच्या पोटी  हवे ते मिळवत चंद्रकांत मोकाट सुटला. शाळेबरोबर  शिस्तही संपली. 11 वी वेस्ट इयर म्हणत तो  चैनबाजीत रमला, आईवडिलांना फसवायच्या युक्त्या आपो आप आत्मसात केल्या. दारू, गुटखा याचे व्यसन लागले. एखादेवेळी वडिलांसमोर  पितळ उघडे पडायची वेळ येई, तेव्हा आईच्या पाठी लपण्याची क्लुप्ती अंमलात आणे. अभ्यासात घसरगुंडी सुरू झाली. तेव्हा आई माझ्याकडे त्याला घेऊन आली. त्याचा हात बघितला असता त्याची ही अधोगती स्पष्ट करत होती  आज बारावी नापास ही चंद्रकांतची पात्रता आहे.
 • नमूना हाताचे परिक्षण (सोबतच्या ठशाचे)
 • 1) हृदयरेषा आणि मस्तकरेषा या मिळून एकच आडवी रेषा. याचा अर्थ बुद्धी, तर्क व भावना यांचा उडालेला गोंधळ. हाताखाली एकाखाली एक दुहेरी मस्तकरेषा मिळून सिमीयन रेषा वागण्यात दुटप्पी वृत्ती . हातावरील दोन  शुक्र कंकणे लागलेली वाईट सवय गुटखा खाणे, मद्यपान व अस्वस्थ प्रकृती, वासनारेषा मद्यासारख्या व गुटख्यासारख्या मादक पदार्थांचे सेवन करण्याच्या प्रवृत्ती  तसेच काम वासनेतील बेसुमार वाढ दर्शवते. आयुष्य रेषा तिची वाटचाल करत असताना त्यावर एक आडवी रेषा दिसते व तिचे द्विभाजन होते त्यामुळे आयुष्याला धोका उद्भवतो .
  2) वय वर्षे 16, 17 ते 20 वर्षे अतिशय खराब कालखंड असून शिक्षणात अडथळे, व्यसनाधिनता.
  3) वय वर्षे 21, 22, 23, 24 शैक्षणिक काळ दर्शवतो. परंतु त्यात अडथळे दर्शवतात. साान्य स्वरुपाचा कालखंड दर्शवतो. 
  5) वय वर्षे 25, 26, स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा योग्य वय वर्षे27, 28, 29, 30 आर्थिक प्रगती होईल , परंतु संथगतीने.
  6) वय वर्षे 31, 31।। भाग्योदय होईल . व्यवसायातून प्रगती दर्शवते. वय वर्षे 32, 33, 34, 35 ते 38 भरभराटीचा काळ असेल.
  7) वय वर्षे 38।।, 39 आर्थिक नुकसान दर्शवते. बौद्धीक, चुकीच्या अंदाजाने यशाचे नुकसान संभवते. (भाग्यरेषा मस्तकरेषेवर थांबते) नुकसान मोठ्या प्रमाणात होईल . त्यामुळे वय वर्षे 40, 41, 42 ते 46 ही वर्षे आर्थिक संघर्षातून जातील. व्यसने पुन्हा बळावतील.
  8) वय वर्षे 46।।, 47 व्यवसाय बदल दर्शवतो. वय वर्षे 48, 49, 50 आर्थिक गाडी रूळावर येईल. वय वर्षे 51, 52 पुन्हा आर्थिक प्रगतीला सुरुवात होईल. वय वर्षे 53, 54, 55 ते पुढील जीवन स्थिर जीवन राहील.
  [वरील हाताचा ठसा व चंद्रकांतच्या हाताचा आईच्या वेळीच सावधगिरीुळे चंद्रकांत वाचला. परंतु त्याच्या आयुष्याचे मोठे  नुकसान झाले ते झालेच. जो चंद्रकांत  मोठा उद्योगपती  अथवा मोठा  अधिकारी झाला असता आज तो  फक्त खाऊनपिऊन सुखी आहे.) वरील भविष्य कथन हे स्वतःची प्रौर्ढी मिरविण्यासाठी नसून तो  हस्तसामुद्रीक शास्त्राचा गौरव आहे असे वाचकांनी सजावे, अशी विनंती आहे.]

 •  
खुनी माणसाचा हात
 • 1) अंगठ्यााचे अग्र गदेसारखे गोल तसेच अंगठ्याचे दोन्ही सांधे कडक आहेत. असा मनुष्य रागात असताना योग्य-अयोग्याचा विचार करत नाही. असे लोक हिंसक प्रवृत्तीचे असतात. हटवादी असतात. रागाच्या रात ते खुनासकट कोणतेही गुन्हे करू शकतात.

  2) गुरूच्या उंचवट्यााच्या वरील बाजूने आयुष्य रेषा सुरू होते. याचा अर्थ अशा माणसांत क्रुरता दर्शविते.
  3) हृदय रेषा व मस्तक रेषा असलेली एकच आडवी रेषा तिला सिमियन रेषा असे म्हणतात. याचाच अर्थ बुद्धी, तक व भावना याचा गोंधळ उडालेला दिसतो आणि वागण्यात चत्कारीपणा दिसून येतो.

  4) हातावर दोन भाग्यरेषा आहेत. याचाच अर्थ दोन व्यवसायातून प्रगती. परंतु त्या दोन  भाग्यरेषेचा शेवट मस्तकरेषेवर झालेला असल्याने मुर्खपणामुळे आयुष्याचे नुकसान होते.

 • 5) हातावर शुक्रकंकण, अति व्यसनी, वाइट सवय व अस्वस्थ प्रकूती दाखविते.
 • शनि उंचवट्याावरील फुलीेचे चिन्ह फाशीची किंवा खून दर्शविते. सदरील व्यक्ती माझ्याकडे 2005 साली आली होती. दोन व्यवसायातून चांगली प्रगती केलेली दिसली. वय वर्षे 32, 33, 34, 35 त्यांच्या आयुष्यातील सुवर्णकाळच होता. वयाच्या 35।। व्या वर्षी त्यांचा घटस्फोट झाला. या व्यक्तीला त्यांच्या रागावर नियंत्रण करण्याचा सल्ला दिला होता; परंतु वयाच्या 36 व्या वर्षी या व्यक्तीच्या हातून खून झाला. आज रोजी  ही व्यक्ती जन्ठेपेची शिक्षा भोगत असून पुढे या व्यक्तीचा खून होऊ शकतो किंवा फाशीची शिक्षा होऊ शकते, असा माझा होरा आहे.
आत्महत्या करणाऱ्या माणसाचा हात
 • 1) शनीच्या उंचवट्यावर बनलेले क्रॉस चिन्ह आयुष्याचा दुर्दैवी अंत दर्शवितो .

  2) हातावर असलेली मस्तक रेषा चंद्राच्या उंचवाट्यावर जाऊन चंद्राच्या उंचवट्याचा खालचा भाग फुगीर अणि जास्त उंच व मस्तक रेषा अणि आयुष्य या दोन्ही बहुतंशा मिळत असल्यामुले ती व्यक्ती आत्महत्या करण्याची इच्छा दर्शवितो.

 • 3) मंगलच्या उंचवट्यावर क्रॉस चे चिन्ह असल्यामुले उग्र व चिडचिडा स्वाभाव दर्शवितो.

 • 4) शनीच्या उंचवट्यावर शनि कंकन दिसते,असे चिन्ह हातावर असलेला मनुष्य ध्येयवादी नसतो,हो किंवा नाही अशी त्याची वृत्ति रहते. तसेच त्याला जीवनात कायम अपयश येते त्यामुले जीवन जगण्याची इच्छा नाही रहत.

 • 5) अयुष्यरेषा एक एक थंबल्यामुले आयुष्याला धोका संभवतो.(हा व्यक्ति जळगांव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातल्या गावातला आहे, वयाच्या ४६ वर्षापर्यंत त्याले खूप संघर्ष केला ,वारंवार आत्मह्त्या करण्याची इच्छा मनात येत होती .एकदा तो माझ्याकडे आला व मी त्यांना सावधान करण्याचा प्रयत्न केला पण ह्या माणसाच्या स्वभावात नैराश्य व निरूत्साह दिसत होती . तसेच त्याच्या सहनशक्तीचा अंत झालेला होता आणि काही दिवसांनी त्याच्या मित्रांना त्याच्या आत्महत्येची वार्ता समजली .ह्याचा अर्थ असा होतो कि जेव्हा सर्व सामान्य जीवनसंघर्ष सहन करण्याची शक्ती संपते तेव्हा तो आत्महात्या करतो. तसेच तो कोणाच्या दबावाखाली नाही करत तर त्याला परिस्थितीचा पूर्णतः अंदाज येतो कि आता काही मार्ग नाही. तेव्हा तो आपल्या जीवनरूपी ड्रमा संपवतो. )

खुनशी प्रवृत्ती
 • खुनशी प्रवृत्ती वाल्या माणसाचा हात हा संभवत: कठोर असतो, त्याचा अंगठा लांब असतो तसेच अंगठा मागे वाकत नाही,आणि हातावर असलेले हे सर्व लक्षण लालची प्रवृत्तीचे चे आहे,अश्या व्यक्ती जे पाहिजे ते मिळवण्यासाठी आपल्या सद्विवेकबुध्दी ने मिळवता.ह्या व्यक्तीची खुनशी वृत्ती जितकी वाढेल तितकी त्याची मस्त रेषा त्याच्या अंतःकरणाच्या आतमध्ये एकत्र होईल व त्याच्यवर त्याचा प्रभाव दाखवेल.

 • 1) हृदयरेषा आणि मस्तीकरेषा मिळून एक आडवी रेषा याचा अर्थ बुद्धी आणि तर्क व भावना यांची अडचण आणि त्या व्यक्तिच्या वर्तुनुकीत आलेली चमत्कारी वृत्ती.

  2) हाताच्या खाली एक का मागे एक सलग मस्तीकरेषा व हृदयरेषा मिळून सिमियन रेषा वर्तुनुकीत दु तोंडी वृत्ती दर्शवितो.

 • 3) हाताच्या वरती दोन शुक्र कंकण लहानपणी लागलेली लागलेल्या वाईट सवई,मद्यपान आणि अस्वस्थ प्रकृती दर्शवितो.

 • 4) वासना रेषा मद्यासारखे मादक पदार्थ खाण्याची सवय तसेच कामवासनेत झालेली वाढ हि रेषा दर्शिवते. हि रेषा शुकाच्या उंचवाट्यावर चालत असते मानून वर दिलेल्यानुसार प्रवृत्तीमध्ये वाढ इतकी वाढते व त्याचा परीणाम मनुष्याच्या वाढीव आयुष्य कमी करण्यात होतो.

 • 5) हि विवाह रेषा हृद्यरेषेला जाऊन मिळते व त्यामुळे वैवाहिक जीवन दु:खी असल्याच दर्शविते.

 • 6) आयुष्य रेषेच्या वरती एक आडवी रेषा दिसते व त्यामळे आयुष्य रेषेचे दुभाजन होते .आणि त्यामुळे आयुष्याला धोका असतो.

 • 7) शनीच्या उंचवाट्यावर क्रॉस चिन्ह असल्यास फाशी किंवा खून होऊ शकतो.

 • ह्या व्यक्तीच्या दृष्टीने खून करणे हि एक कला आहे आहे आणि त्या कलेत तो माहीर आहे. आणि असा व्यक्ती ठिकठाक विचारकरुन खून करत असेल,त्यामुळे तो दोन वेळा खून करून पण तो खुनाच्या आरोपातुन सही सलामत बाहेर आला पण पुढे काय ?

एका प्रसिद्ध यशस्वी सिनेतारीकेचा हात

 • 1) आयुष्य रेषा आणि मस्तक रेषेत अंतर दिसते. याचा अर्थ आत्मविश्वास, फाजिल स्वातंत्र्य, विरुद्धलिंगी मित्र असण्याकडे कल तसेच दुसऱ्याचे दोष काढण्याची वृत्ती. 

  2) गुरू उंचवट्याावर असणाऱ्या मुली चिन्हामुळे महत्वांकाक्षापूर्ती होते.

  3) मस्तक रेषा गुरू उंचवट्याावर सुरू होते  तसेच ती रेषा सरळ असल्याने तिची बुद्धीमत्ता  व हुशारी दिसते. 

  4) रवी रेषेचा उगम चंद्र उंचवट्याावरून होते. त्यामुळे अफाट लोकप्रियता मिळते.

  5) रवी रेषेवर उंचवट्यााखाली नक्षत्र चिन्ह आहे. यामुळे मानमराबत व प्रतिष्ठा मिळते.

  6) विवाह रेषा शेवटी दुंभागलेली असल्याने पती-पत्नीत विरह, घटस्फोट  दर्शवितो.

 • 7) दोन्ही हातावर चार पाच विवाह रेषा याचा अर्थ अनेकांशी प्रेमप्रकरणे किंवा शरीरसंबंध.

 • 8) मस्तक रेषेतून निघालेला एक फाटा हृदय रेषेकडे कुणा एका व्यक्तीबद्दल आत्मीयता दर्शविते.

 • 9) वयाच्या 20 वर्षी भाग्य रेषेचा उगम होतो . याचा अर्थ पैसै कमाविण्यास सुरुवात.

 • 10) वय वर्ष 23 भाग्योदय होतो . वय वर्ष 24, 25, 26, 27, 28, 29, 30 अतिशय वेगाने प्रगती होईल . समाजात मान प्रतिष्ठा वाढेल. 

 • 11) वय वर्ष 31 विवाहयोग दर्शवतो . वय वर्ष 32,33,34 त्रासाचा कालखंड दर्शवतो  वय वर्ष 35, 36 कोर्ट कचेरीचे प्रसंग, अपकिती, घटसस्फोट इत्यादी घटना दर्शवितात. 

 • 12) वय वर्ष 37 भाग्योदयाचा श्रीगणेशा होईल . वय वर्ष 38, 39, 40, 41 ते पुढील जीवन सुखी जीवन असेल. आप पैसा मिळेल. यश व लोकप्रियता मिळेल. विवाह सौख्य नाही. आयुष्यात वेगवेगळ्या व्यक्ती येतील. परंतु सुख मिळणार नाही.

 • [सदरील सिनेनटी हिंदी फिल्म इंडस्ट्रीत नंबर एकची हिरोईन ओळखली जाते. महिन्या दोन महिन्यात एखादेतरी प्रमेसंबंधाबद्दल अफेयर ऐकायला मिळते. आज रोजी तिचे वय 27 आहे. पुढील भविष्य मी सांगितलेप्राणे घडेल असा माझा होरा आहे.]

Copyright © 2017 palmistryresearch.com. All rights reserved. Design by Ultraliant Pvt Ltd
Ask Question