हस्तरेखाशास्त्र


हस्तसामुद्रिक या शास्त्राचे खरे नाव हस्तविज्ञान शास्त्र हे असे आहे. या शास्त्राचे तीन प्रमुख विभाग आहेत. पहिल्या विभागाला हस्तलक्षणशास्त्र ( Cheirognomy ) असे नाव असून त्यामध्ये हाताचा आकार, हाताची विभागणी, हाताचा रंग, हाताची त्वचा, हाताची बोटे, नखे, अंगठा व ग्रहांचे उंचवटे इत्यादींचा समावेश होतो. दुसऱ्या विभागाला हस्तरेषाशास्त्र ( Cheirognomy ) असे म्हणतात. यात हातावरील रेषांचा समावेश होतो. या रेषांध्ये सहा मुख्य रेषा असून आठ दुय्यम रेषा आहेत.

हस्तविज्ञान शास्त्र
हस्तलक्षण शास्त्र

 • 1) हाताचा आकार आणि प्रकार
 • 2)हाताची विभागणी
 • 3) हाताचा रंग, त्वचा, मजबुती, लवचिकपणा
 • 4) अंगठा
 • 5) बोटे
 • 6)बोटांची नखे
 • 7) हातावरील ग्रहांचे उंचवटेसहा मुख्य रेषा

 • 1) आयुष्य रेषा
 • 2) अंत:करण रेषा
 • 3) मस्तक रेषा
 • 4) भाग्य रेषा
 • 5) रवी रेषा
 • 6) आरोग्य रेषा (बुध रेषाआठ दुय्यम रेषा

 • 1) मंगळ रेषा
 • 2) विवाह रेषा
 • 3) वासना रेषा
 • 4) संतान रेषा
 • 5) प्रवास रेषा
 • 6) अंतज्र्ञानरेषा
 • 7) मणिबंध रेषा
 • 8) शुक्रकंकण

PALMISTRY

हस्तलक्षण शास्त्र
हाताचे मूळ सात प्रकार आहेत. त्यातील मुख्य पाचच आहेत.
 • 1) चौकोनी हात`: व्यवस्थितपणा, दूरदृष्टी, विवेक
 • 2) निमुळता हात : सौंदर्यदृष्टी व विषयासक्ती
 • 3) गाठीयुक्त व तत्वज्ञानी हात : तत्वज्ञान
 • 4) अति निमुळता हात : भावनाशील, अव्यवहारी, लहरी
 • 5) सुपासारखा हात :कर्तृत्व, उत्साह, स्वैरविचार,संशोधन
हाताचा रंग व त्वचा
 • 1) त्वचेचा अतिशय फिकट रंग : स्वार्थी दुटप्पी
 • 2) पिवळसर रंगाची त्वचा :मनाची दुर्बलता, घाबरट
 • 3) तांबूस व रंगीबिरंगी त्वचा : आनंदी व उत्साही, सारासार विचार
 • 4) त्वचेचा तांबडा रंग: रागीट स्वभाव
 • 5) अति तांबडी त्वचा : अतिशय रागीट स्वभाव
 • 6) मुलायम त्वचा : सोज्वळ, सहकार्याची भावना
 • 7) रुक्ष त्वचा : कठोरपणा
 • 8) सर्दीयुक्त त्वचा : नीतीमूल्याची कमतरता, स्वार्थत्याग
अंगठा
हस्तसामुद्रिक शास्त्रात अंगठ्याला असाधारण महत्व आहे. अंगठ्यावरून व्यक्तीच्या इच्छाशक्तीचा बोध होतो. अंगठ्यााचे दोन प्रकार आहेत.
 • 1) मोठा अंगठा :तीव्र इच्छाशक्ती, आत्मविश्वास, करारीपणा, शहाणपण, वैचारिक कूतीशीलता
 • 2) छोटा अंगठा : अस्थिर स्वभाव,मानसिक आजार, कमी बुध्यांक
 • 3) लाल व रंगीत त्वचा : खुश आणि उशाहपूर्ण ,सामान्य विचार
 • 4) लाल रंगाची त्वचा : रागीट स्वभाव
 • 5) खूप लाला त्वचा : खूप रागीट स्वभाव
 • 6) मऊ त्वचा : चांगला स्वभाव
 • 7) कडक त्वचा: कठोर पणा (कठोरता)
 • 8) ओलावा सहित त्वचा: नैतिक मूल्यांचा अभाव ,बलिदानाची वृत्ती .
बोटे
 • 1) गुरूचे बोट :गुरूच्या बोटावरून स्वाभीमान, महत्वाकांक्षा, अधिकार, धार्मिकता, प्रतिष्ठा या गोष्टी समजतात.
 • 2) शनिचे बोट :हाताचे मधले बोट शनीचे बोट असते. हे बोट सर्व बोटांपेक्षा लांब असते. हे बोट अति लांब असल्यास गंभीर स्वभाव दर्शविते. परंतु हे बोट लहान असल्यास बालीशपणा व अश्लीलता दाखवते.
 • 3) रवीचे बोट :रवीच्या बोटावरून व्यक्तीचे कलेवर प्रेम व निसर्गप्रेम समजते रवीचे बोट गुरू बोटापेक्षा लांब असल्यास अशा माणसाची जुगारी प्रवृत्ती असते. रवी बोट चांगले असल्यास अशा व्यक्तीत आत्मविश्वास असतो.
 • 4) बुधाचे बोट : करंगळीलाच बुधाचे बोट म्हणतात हे बोट हातावरील सर्वात लहान बोट आहे. हे बोट प्राणापेक्षा लांब असल्यास अशा माणसाचे वक्तृत्व चांगले असते. करंगळी लांब असेल तर दूरदर्शी, विद्वान होण्याची इच्छा असते. करंगळी जाड असल्यास व्यापारी दृष्टी व पैसा मिळविण्याची इच्छा असते.
हातावरील ग्रहांचे उंचवटे
उंचवट्याचे गुणधर्म
 • गुरू उंचवटा : 1) स्वामीमान 2) महत्वकांक्षा 3) धार्मिकता 4) नितीमत्ता 5) प्रतिष्ठा 6) प्रेम 7) कतृत्व 8) उत्साह 9) कतृत्व 10) नेतृत्व.
 • शनि उंचवटा : 1) सहनशीलता 2) गंभीरपणा 3) न्यायप्रियता 4) विद्वत्ता 5) कष्टाळूपणा 6) शहाणपणा 7) मनाचा समतोलपणा 8) धर्मभोळा.
 • रवि उंचवटा : 1) कला 2) चातुर्य 3) बुद्धीमत्ता 4) यश 5) वक्तृत्व 6) स्वतंत्रवृत्ती 7) उत्साह 8) हरहुन्नरी ( टमतेंजपसम) 9) यशस्वी (10) स्फूर्ती
 • बुध उंचवटा : 1) शास्त्रीय संशोधन 2) उद्योगी 3) व्यापारी वृष्टी 4) धूर्तपणा 5) चातुर्य 6) झटपट निर्णय 7) चपळता 8) माणसांची पारख.
 • मंगळ उंचवटा : 1) आक्रमक वृत्ती 2) लढाऊ वृत्ती 3) लढण्याची वृत्ती 4) बाणेदारपणा 5) हिम्मत 6) उत्साह 7) उदार वृत्ती 8) अन्यायाची चीड.
 • चंद्र उंचवटा : 1) स्वप्नाळू वृत्ती 2) आदर्शवादी 3) काल्पनिक 4) प्रवासाचे वेड 5) गुढ विद्येचे आकर्षण 6) थंड स्वभाव 7) लहरी स्वभाव 8) स्वार्थी.
 • शुक्र उंचवटा : 1) सौंदर्य 2) रोगप्रतिकारशक्ती 3) प्रेम 4) कला 5) उत्साह 6) मोहक व्यक्तीत्व 7) उदार 8) सौंदर्यप्रेम 9) संगिताची आवड 10) प्रभावी वासना.
 • हर्षल उंचवटा : हर्षल उंचवटा हा आयुष्यातील घडामोडी तसेच अचानक होणारे बदल दाखवतो . 1) कृतीशीलता 2) बुद्धीमान 3) बदल घडवण्याची प्रवृत्ती.
हस्तरेषा शास्त्र
 • हाताच्या रेषेवरून फक्त स्वभाववर्णनच सांगता येते, असे नसून व्यक्तीचा भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळही सांगता येतो. हाताच्या रंगाशी रेषांचा रंग जुळता मिळता असावा लागतो. देशाच्या हवामानाप्राणे व व्यक्तीच्या स्वत:च्या रंगाप्राणे रेषांच्या रंगात कमी अधिक फरक पडतो.हातावरील रेषा जर मध्येच तुटल्या असतील तर आयुष्यात चढउतार संभावतात. हातावर सहा मुख्य रेषा असून आठ दुय्य रेषा असतात.
 • 1) हृदय रेषा (Heart line) : या रेषेवरून व्यक्तीच्या भावना, प्रेम, संस्कार इत्यादी गोष्टींचा बोध होतो. ही रेषा जेवढी सरळ तितक्या त्या व्यक्तीच्या भावना स्त्री स्वभावाच्या असतात व त्याप्रमाणेच त्यात व्यावहारीक गणित असते. उलट त्या रेषाला बाक असेल तर तेवढी पुरुषी प्रवृत्ती व भावनाप्रधान प्रवृत्ती असते.
 • 2) मस्तक रेषा (Head line ) : मस्तकरेषेवरून मनुष्याच्या अंगी असणारी ग्रहणशक्ती, त्याची बुद्धिता, कल्पकता व त्याचे चातुर्य त्याचा सर्वसाधारण दृष्टीकोन या सर्व गोष्टींचा बोध होतो. मस्तकरेषा सरळ असून छोटी असेल तर व्यक्तीमत्वाचा फारसा विकास झालेला नसतो. काही काळ रेषा सरळ असून एकदम खालील बाजूस जात असेल तर लहरी, चमत्कारी व अस्वस्थ स्वभावाचे दर्शन होते, अशी व्यक्ती अविचारी असते.
 • 3) आयुष्य रेषा ( Life Line ): आयुष्यरेषेवरून शारीरिक जोम (बल) आरोग्यातील कणखरपणा, निरनिराळ्या काळातील आरोग्य व प्रड्डतीत बिघाडाचा काल, अपघात, गंडातरे, मनुष्यातील अंगातील उत्साह, आत्मविश्वास धडाडी त्याचप्राणे आयुष्यातील चढ उतार या गोष्टींचा प्रामुख्याने बोध होतो. प्रत्येक व्यक्तीनुसार ही रेषा वेगळी असते. ही रेषा आखूड असल्यास आयुष्य थ¨डे असते असे नव्हे परंतु आयुष्याचा योग्य तर्हेने उपभोग घेतलेला नसतो.
 • 4) भाग्यरेषा ( The Line of Fate ):भाग्यरेषेचा उगम हातावरील खालच्या बाजूला होतो व ती सरळ शनी उंचवट्याााकडे जाते. बऱ्याच वेळा भाग्यरेषेचा शेवट इतर उंचवट्याााावरही होतो. या रेषेमुळे व्यक्तीच्या कर्तृत्वाची कल्पना येते तसेच या रेषेवरून साजप्रियताही सजते. व्यवसाय,नोकरीत होणारे चढ- उतार या रेषेवरून सजतात.
 • 5) रवी रेषा ( Line of Sun ) :हातावर मनगटापासून सुरू होण्याऱ्या हाताच्या रवी उंचवट्याााावर जाणाऱ्या रेषेला रवी रेषा म्हणतात. हातावर रवी रेषा असल्यास अशा व्यक्तीत बुद्धीमत्तेची देणगी असते आणि तिच्याच जोरावर त्या व्यक्तीच्या नशिबाचे गुढ उकलले जाते. अशा व्यक्तीचे प्रसन्न व्यक्तिमत्व असते. रवीरेषेवरून व्यक्तीला मिळणारे यश दाखवते. रवीरेषेमुळे व्यक्तीत ग्रहणशक्ती, आशावाद, शिकण्याची आवड, कलासक्त स्वभाव इत्यादी गुण येतात.
 • 6) बुध रेषा ( Mercury Line ) : बुधरेषेलाच आरोग्य रेषाही म्हणतात. ही रेषा हातावर नसेल तर आरोग्य चांगले असते. ही रेषा आयुष्यरेषेला जेथे मिळते तितके आयुष्यान असते. या रेषेवरून व्यावसायिक जीवनातील चढउतारही सजतात. ही रेषा हातावर उठावदार व दोषरहीत असल्यास ती यश व संपादित दर्शवते. त्याप्रमाणे उत्तम प्रकृतीही दाखवते.
आठ दुय्यम रेषा
 • 1 ) मंगळ रेषा ( Mars Line ) : खालच्या मंगळ पर्वतावर उगम पावते व आयुष्यरेषेला समांतर जात शुक्र पर्वतावर जाते. हिला संरक्षण रेषा, संघर्ष रेषा, आयुष्यरेषा असेही म्हणतात. मंगळ रेषा असणाऱ्या व्यक्तीचा पराक्रम, प्रतिकारशक्ती विलक्षण असते. अपमान किंवा कुरघोडी करू पाहणारा यांना सहन होत नाही.
 • 2) विवाह रेषा ( Line of Marriage ) : बुध उंचवट्या खाली व हृदयरेषेच्या वर असलेल्या आडव्या रेषा यांच्यातील ठळकरेषा दिसेल तीच विवाहरेषा असते. विवाह रेषा ही रेषा एकच असल्यास ते चांगले लक्षण असते.
 • 3) वासना रेषा ( The Via Lascivs ): वासनारेषेला आरोग्यरेषेची सहाय्यक रेषा सजली जाते. तळव्याच्या खालच्या भागात उगम पावून ही खाली मणिबंध रेषांकडे जाते. ही रेषा अशुभ समजली जाते. वासनारेषेवर नक्षत्रचिन्ह असल्यास यश व श्रीमंती दाखवते.
 • 4) संतान रेषा ( Children) : विवाहरेषेवर उभ्या असलेल्या बारीक रेषा म्हणजेच संतानरेषा होय. ह्या रेषांची स्थिती कशी आहे आणि त्या ग्रहाच्या उंचवट्यााच्या कोणत्या भागास स्पर्श करतात हे पाहून त्या व्यक्तीला मुलगा होईल की मुलगी त्या मुलांची प्रकृती चांगली असेल की वाइट आणि ते मुले त्यांच्या आयुष्यात काही विशेष महत्वपूर्ण कार्य करू शकतील की नाही या सर्व गोष्टींचे ज्ञान होऊ शकते.
 • 5) प्रवास रेषा ( Line of Travel ) : चंद्रग्रहावरील असणाऱ्या आडव्या रेषांना प्रवासरेषा म्हणतात. त्याचप्राणे मनगटावर असणाऱ्या उभ्या रेषा यांना सुद्धा प्रवासरेषा म्हणतात. चंद्र उंचवट्याावरील काही रेषा परदेशप्रवास किंवा जलप्रवास दर्शवतात. या रेषा लांब असल्यास प्रवास दूरचे असतात.
 • 6) अंतज्र्ञान रेषा ( Intution Line ) : चंद्रग्रहावरून बुध ग्रहाकडे जाणारी अर्धगोलाकार रेषा म्हणजेच अंतज्र्ञान रेषा होय. ही रेषा असतीलच तर तत्वज्ञ किंवा किंचित निमुळत्या अथवा अति निमुळत्या हातावर असते. ही रेषा असणाऱ्या व्यक्तीला अतिसूक्ष्म संवेदनांची देणगी मिळालेली असते. अशा व्यक्तीला कोणत्यातरी अज्ञात, गुढ शक्तीद्वारे किंवा ज्ञानाद्वारे त्याला दुसऱ्या लोकांसंबंधी भविष्यकाळात घडणाऱ्या घटनांची जाणीव आधीच होते.
 • 7) मणीबंध रेषा ( Resette ) : तळहाताच्या खाली मनगटावर असणाऱ्या आडव्या रेषांना मणीबंध रेषा म्हणतात. मणीबंध रेषेवरून आयुष्यान व चांगले नशीब याचा बोध होतो. गुलाबी रंगाच्या तीन मणीबंध रेषा असल्यास ऐश्वर्य, स्वास्थ्य व मनाची शांतता लाभते. या तीन रेषा स्वच्छ व स्पष्ट असल्यास दिर्घायुष्य दाखवितात व आयुष्यरेषा आखूड असली तरी तिचा दोष नाहीसा होतो.
 • 8) शुक्रकंकण ( Gridle of Venus ) : ज्या व्यक्ती अतिशय संवेदनशील, बबुद्धीमान व चंचल मनोवृत्तीचे व भावनाप्रधान असतात. अशा लोकांच्या हातावर शुक्रकंकण रेषा पहावयास मिळते. ही रेषा गुरू आणि शनिग्रहाच्या मधून निघून बुध आणि रवीग्रहाच्या मध्ये जाऊन मिळते. शुक्रकंकण असणाऱ्या व्यक्ती कोणत्या ना कोणत्या मानसिक तणावाखाली वावरत असतात.
Copyright © 2017 palmistryresearch.com. All rights reserved. Design by Ultraliant Pvt Ltd
Ask Question